झिराडमधील विजेचा प्रश्न सुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झिराडमधील विजेचा प्रश्न सुटला
झिराडमधील विजेचा प्रश्न सुटला

झिराडमधील विजेचा प्रश्न सुटला

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील झिराडपाडा व गुरव आळी परिसरात विजेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी पाठपुरावा केला. त्‍याला यश आले असून महावितरणच्या सहकार्याने झिराडमधील अत्यावश्यक सुधारणांची कामे वेगाने पूर्ण झाल्याने विजेचा प्रश्न सुटला आहे.
अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेत झिराडपाडा येथील वीजवितरण समस्या सोडवण्यासाठी दोन नवीन एबी स्वीच बसविणे, गुरवआळी येथे जुने झालेले कंडक्टर बदलणे, जुने खांब बदलणे आणि आवश्यक तिथे अतिरिक्त खांब उभारणे, अशा मागण्या केल्या होत्या. ही कामे मार्गी लावण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदन भिसे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता सावरकर आणि किहिम शाखेच्या कनिष्ठ अभियंता ज्योती बडे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना समस्येची जाणीव करून दिली. त्यानंतर मागणीचे निवेदन दिले होते. याची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू केले. अवघ्या पाच दिवसांत महावितरणची कामे करण्यात आल्‍याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

झिराडपाडा व गुरव आळीतील वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांत विजेचा प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांमुळे मार्गी लागला असून त्यांच्याकडून चांगले सहकार्य लाभले.
- दिलीप भोईर, माजी सभापती, समाज कल्याण विभाग, रायगड