ढगाळ वातावरणामुळे भातपिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ वातावरणामुळे भातपिके धोक्यात
ढगाळ वातावरणामुळे भातपिके धोक्यात

ढगाळ वातावरणामुळे भातपिके धोक्यात

sakal_logo
By

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात हळवर जातीची भात पिके कापणीसाठी तयार झाली आहेत; मात्र गेल्या दोनतीन दिवसांत दररोज पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सतत पडणारा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व कमालीच्या गारठ्यामुळे मुरबाड तालुक्यातील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरबाड तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांशी शेती एकपिकी असल्याने पाऊस असाच चालू राहिल्यास भात कापणी करता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने उत्तम भात पीक आले आहे. बहुतेक ठिकाणी भात पीक कापणीसाठी तयार होत चालले आहे; परंतु सततचे ढगाळ वातावरण व पाऊस पडत असल्याने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.