विक्रमगड नगरपंचायत प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड नगरपंचायत प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर
विक्रमगड नगरपंचायत प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर

विक्रमगड नगरपंचायत प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतीचा प्रारूप विकास योजना आराखडा तयार करण्यात आला. याला नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. विक्रमगड शहराचा तयार केलेला प्रारूप विकास योजना आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रसिद्धीसाठी नगरपंचायतीस हस्तांतरित करण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या झालेल्या विषय सभेमध्ये त्यास मंजुरी देण्यात आली. या सभेस विक्रमगड नगरपंचायत नगराध्यक्ष नीलेश पडवळे, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, मुख्याधिकारी अजय साबळे, सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. या प्रारूप विकास योजना आराखड्यास कोणाच्याही हरकती अगर सूचना असतील त्यांनी नगरपंचायतीस लेखी अर्ज ३० दिवसांच्या आत सादर करावे, असे आवाहन विक्रमगड नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.