कशेडी घाटात ट्रक पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाटात ट्रक पलटी
कशेडी घाटात ट्रक पलटी

कशेडी घाटात ट्रक पलटी

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ९ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रोह्याकडे जाणारा ट्रक अवघड वळणावर उतारावर पलटी झाल्याची घटना चोळई गावाजवळ घडली. अपघातात जीवितहानी टळली असली तरी चालक किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील दिरंगाईचा फटका वाहनचालकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांत या ठिकाणी सात ते आठ अपघात झाल्याची नोंद आहे.
ट्रकचालक येल्लह एन. रामा कुष्‍णडू (४१) हा आंध्र प्रदेशातून रोह्याकडे निघाला होता. महामार्गावर कशेडी घाट उतरताना चोळई गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने ट्रक पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्‍यानंतर महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताची नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलादपूर ः कशेडी घाटातील वळणावर ट्रक पलटी झाला.