झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसन करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसन करा!
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसन करा!

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसन करा!

sakal_logo
By

चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः चेंबूर येथील पांजरापोळ परिसरातील दिन क्वारी मार्गावरील घरे व दुकानदारांना एमएमआरडीए व पालिकेकडून सतत कारवाईची नोटीस दिली जात आहे. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांचे इतर विभागांत स्थलांतर करण्यापेक्षा परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात समाविष्ट करावे, अशी मागणी दिन क्वारी विकास नागरिक समितीने केली आहे.
चेंबूर येथील पांजरापोळ येथील दिन क्वारी मार्गाला लागून अनेक वर्षे जुनी एकूण २३ घरे व जवळपास ८४ दुकाने आहेत. येथील मार्ग मोठा असला तरी या मार्गावर घरे व दुकानांचा अडथळा येत असल्याचे कारण देत प्रशासनाकडून वारंवार कारवाईबाबत नोटीस येत असल्‍याचे समितीचे म्‍हणणे आहे. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले आहेत. आमचे अन्य ठिकाणी स्थलांतर केल्यास आमची उपासमार होईल. आम्ही जगायचे कसे, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
दरम्‍यान, प्रशासनाने येथील नागरिकांचे पुनर्वसन परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात करावे, अशी मागणी दिन क्वारी विकास नागरिक समितीने केली आहे.
दिन क्वारी नागरिक समितीच्या माध्यमातून याबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यहार करण्यात आला आहे.

दिन क्वारी मार्ग मोठा आहे. तरीसुद्धा संबंधित अधिकारी आम्हाला नोटीस देत आहेत. आमची फसवणूक केली जात आहे. आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागू, तसेच वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू.
- सलामत अन्सारी, समिती सदस्‍य