अंबरनाथ रेल्वे स्थानकातील जिना पाडण्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ रेल्वे स्थानकातील जिना पाडण्याचे काम सुरू
अंबरनाथ रेल्वे स्थानकातील जिना पाडण्याचे काम सुरू

अंबरनाथ रेल्वे स्थानकातील जिना पाडण्याचे काम सुरू

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : अंबरनाथ रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडल्यानंतर त्याला जोडणारा जिनादेखील पाडण्याचे काम रेल्वेतर्फे सुरू करण्यात आले आहे. रेल्वेस्थानकातील फलाट एक आणि दोनच्या मध्यभागी असणारा कर्जतच्या दिशेकडील पादचारी पूल आणि त्याला जोडणारा जिना जुना आणि धोकादायक झाल्याने तो पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बहुतांशी लोकल फलाट एक आणि दोनवरच येत असल्याने लोकलमधून उतरून पूर्व आणि पश्चिम दिशेकडे बाहेर जाण्यासाठी असलेल्या पुलाचे आणि जिन्याचे पाडकाम सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याच फलाटावर मध्‍यभागी नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचा वापर प्रवाशांना करावा लागतो. याच जुन्या पुलाला सरकता जिना बसवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून सरकता जिना बंद असल्याने वयोवृद्ध, दिव्यांग, तसेच महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पादचारी पूल आणि त्याला जोडणाऱ्या जिन्याचे बांधकाम केले जाणार आहे.