शाहू नगरमध्ये घाणीचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू नगरमध्ये घाणीचे साम्राज्य
शाहू नगरमध्ये घाणीचे साम्राज्य

शाहू नगरमध्ये घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By

धारावी, ता. ९ (बातमीदार) : धारावीतील राजर्षी शाहू नगर येथील पालिका वसाहतीतील इमारत क्रमांक ग-१ च्या बाजूला राडारोडा टाकण्यात आला आहे. तसेच वसाहतीमधील सर्व कचरा येथे मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
दरम्‍यान, मुंबईत विविध आजारांनी डोके वर काढले आहे. धारावीतही पावसाळी आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच कचरा रस्त्यावर सतत पडून राहत असल्याने आजारांना आंमत्रण मिळत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्‍याने येथे ही समस्‍या निर्माण झाल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

रात्री पडतो राडारोडा
येथील कचऱ्याजवळच काही बांधकाम व्यावसायिक रात्रीच्या वेळी गुपचूप राडारोडा टाकून जात असल्‍याचा आरोप स्‍थानिकांकडून होत आहे. यामुळे येथून चालणेही अडचणीचे झाले आहे. पालिकेने यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रोगराईला आमंत्रण
वसाहतीत पडलेला कचरा व्यवस्थित व वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्‌भवू शकतो. प्रत्येक वेळी फोन करून पालिका अधिकाऱ्यांना सांगावे लागते. तरीही कचरा उचलला जात नसल्‍याचे येथील रहिवासी गणेश परब यांनी सांगितले; तर कचरा टाकला जातो त्याच्या आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घराच्या खिडक्या-दरवाजे सतत बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असल्‍याची टीका रहिवासी उल्हास विचारे यांनी केली.