कासा परिसरात प्रचारफेऱ्यांना सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा परिसरात प्रचारफेऱ्यांना सुरवात
कासा परिसरात प्रचारफेऱ्यांना सुरवात

कासा परिसरात प्रचारफेऱ्यांना सुरवात

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे रविवार सुट्टीच्या दिवशी सर्वच पक्षांनी कासा बाजारपेठेत प्रचारफेरीला सुरुवात केली आहे. कासा ग्रामपंचायतीत १७ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत चौरंगी लढत रंगणार आहे. येथे महाविकास आघाडी, भाजप, शिंदे गट, बहुजन विकास आघाडी, मनसे अशी लढत होणार आहे. रविवारी महाविकास आघाडी व महायुती या दोघांनी प्रचारफेरी काढत मतदारांच्या भेटी घेतल्या.