नियोजन अधिकारी पद वर्ग एक अधिकाऱ्याकडे द्यावे : विनोद निकोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियोजन अधिकारी पद वर्ग एक अधिकाऱ्याकडे द्यावे : विनोद निकोले
नियोजन अधिकारी पद वर्ग एक अधिकाऱ्याकडे द्यावे : विनोद निकोले

नियोजन अधिकारी पद वर्ग एक अधिकाऱ्याकडे द्यावे : विनोद निकोले

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : पालघर जिल्हा नियोजन अधिकारी वर्ग एक पद हे मागील दोन वर्षांपासून रिक्त असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी वर्ग दोन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा कार्यभार नियमबाह्य असल्याचे सांगत हे पद वर्ग एक अधिकाऱ्याकडेच देण्याची मागणी डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन १ ऑगस्ट २०१४ मध्ये नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी नवीन जिल्हा असल्यामुळे आवश्यक कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, कार्यालयीन व्यवस्था पुरेशा नसल्याने गैरसोय होत होती. मात्र नवीन जिल्हा निर्मिती होऊन ८ वर्षांचा कालावधी लोटला असताना, तसेच नवीन भव्य अशा जिल्हा मुख्यालय संकुलामधून कारभार सुरू झालेला असताना अजूनही प्रशासकीय कामकाज धीम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनामध्ये जिल्हा नियोजन समिती महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते. मात्र वर्ग एक दर्जाचा अधिकारी उपलब्ध असताना वर्ग दोनच्या अधिकाऱ्याकडून पालघर जिल्हा नियोजनासारख्या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार हाताळला जात आहे. शासन निर्णयाप्रमाणे हा पदभार वर्ग एक अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक असताना शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून नियमबाह्य पद्धतीने हा कार्यभार वर्ग दोनच्या अधिकाऱ्याकडे सोपविला गेला आहे, असा आरोप आमदार निकोले यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी निकोले यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.