जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा १० नोव्हेंबरनंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा १० नोव्हेंबरनंतर
जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा १० नोव्हेंबरनंतर

जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा १० नोव्हेंबरनंतर

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) : शालेय क्रीडा स्पर्धेची आतुरतेने वाट बघणारे विद्यार्थी व शारीरिक शिक्षकांची प्रतीक्षा संपणार असून १० नोव्हेंबरनंतर पालघर जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी सांगितले. जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेबाबत सहभागी शाळांच्या शारीरिक शिक्षकांची बैठक नुकतीच पालघर येथे झाली. त्यावेळी शिक्षकांच्या जिल्हा व तालुका स्तरावरील संघटनासुद्धा सहभागी झाल्या होत्या. यात सुमारे ३०० शाळांनी या स्पर्धेत नोंदणी करण्याची तयारी दाखवली. या मोसमापासून ९३ खेळांच्या स्पर्धा होतील, त्यातील ऑलिंपिक आशियाई स्तरावरील सुमारे ५० खेळ आहेत. या खेळांच्या स्पर्धांना भविष्यातील राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा लक्षात घेऊन पसंती देण्यात येईल. अर्थात यंदा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता धूसर आहे.
पालघर जिल्हा क्रीडा कार्यालयास बॉक्सिंग व हँडबॉल या राज्यस्तरीय स्पर्धेबरोबर विभागीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन देण्यात आले आहे. या स्पर्धेबाबत शिक्षकांच्या बैठकीत ही चर्चा झाली आहे. दरम्यान, विविध शालेय क्रीडा स्पर्धेसाठी ऑनलाईन सहभाग आवश्यक आहे, त्याबाबतही क्रीडा शिक्षकांना बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत.