अंमली पदार्थांच्या साठ्यासह तरुणाला अटक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थांच्या साठ्यासह तरुणाला अटक.
अंमली पदार्थांच्या साठ्यासह तरुणाला अटक.

अंमली पदार्थांच्या साठ्यासह तरुणाला अटक.

sakal_logo
By

अमली पदार्थांसह
तरुणाला अटक
मानखुर्द, ता. ९ (बातमीदार) ः गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातून अमली पदार्थ एमडीच्या साठ्यासह मेहताब अली ऊर्फ गोगा (वय २६) याला शनिवारी (ता. ८) पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६० ग्रॅम एमडीचा साठा जप्त करण्यात आला असून शिवाजी नगर पोलिसांनी त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याआधीही अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यात तो सहभागी होता. त्याचा शोध शिवाजी नगर पोलिस घेत होते.

शिवाजी नगर पोलिसांना गस्तीदरम्यान रोड क्रमांक सहाजवळ एक संशयास्पद कार आढळली. पोलिसांना पाहताच आरोपी गोगाने कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत त्याच्याकडे एमडीचा साठा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.