अश्विनी बिद्रे हत्याकांड, साक्षीदारांची सर तपासणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्विनी बिद्रे हत्याकांड, साक्षीदारांची सर तपासणी पूर्ण
अश्विनी बिद्रे हत्याकांड, साक्षीदारांची सर तपासणी पूर्ण

अश्विनी बिद्रे हत्याकांड, साक्षीदारांची सर तपासणी पूर्ण

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात शुक्रवारी सायबरतज्ज्ञ अमित गाडेकर आणि पोलिस उपनिरीक्षक राजू बैकर या दोन साक्षीदारांची सरतपासणी करण्यात आली. या दोन्ही साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे अश्विनी यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ आणि अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर त्या जिवंत आहेत हे भासवण्यासाठी आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरून पोलिस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या शुक्रवारी या दोन्ही साक्षीदारांची आरोपीचे वकील उलटतपासणी घेणार आहेत. अश्विनी यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पढेलवार यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. सायबर संगणकतज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सायबरतज्ज्ञ अमित गाडेकर आणि राजू बैकर यांची साक्ष नोंदवली. गाडेकर यांनी अश्विनी यांच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधून मोठ्या प्रमाणात डाटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरने केलेल्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ या लॉपटॉपमध्ये सेव्ह करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.