खासगी बसची अज्ञात वाहनाला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसची अज्ञात वाहनाला धडक
खासगी बसची अज्ञात वाहनाला धडक

खासगी बसची अज्ञात वाहनाला धडक

sakal_logo
By

शहापूर, ता. ९ (बातमीदार) ः संगमनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बसमधील ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर आसनगाव पुलावर आज झालेल्या अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर रुग्णांना पुढे हलवण्यात आले आहे. संगमनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बस चालकाने बसपुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. आसनगाव पुलावर रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हा अपघातात झाला. या अपघातातील ३३ जखमी प्रवाशांपैकी ११ प्रवाशांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात; तर २२ प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर बसचालक फरार झाला असून शहापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत अपघाताचा अधिक तपास शहापूर पोलिस करीत आहेत.