सीएनजीचे दर कमी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजीचे दर कमी करा
सीएनजीचे दर कमी करा

सीएनजीचे दर कमी करा

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (वार्ताहर) : वाढत्या सीएनजीच्या दराने महिला रिक्षाचालक मेटाकुटीला आल्या आहेत. खरेदी केलेल्या रिक्षाच्या कर्जाचे हप्ते, दंडात्मक कारवाई, आकाशाला भिडणारे इंधनाचे दर यामुळे उदरनिर्वाहासाठी कर्ज काढून खरेदी केलेल्या रिक्षांचे ओझे असह्य होत असल्याची भावना महिला रिक्षा चालक व्यक्त करत आहेत. यामुळे सीएनजीचे दर कमी करा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रणरागिणी महिला रिक्षा चालक/मालक संघटनेद्वारे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वाढत्या महागाई आणि वाढते सीएनजीच्या दराने महिला रिक्षा चालक मेटाकुटीला आल्या आहेत. सीएनजीचे दर वाढतात; मात्र रिक्षाचे भाडेही वाढत नाही. इंधन दरवाढीमुळे रिक्षाचे बेसिक भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये केले. सीएनजीच्या दरात कमालीची वाढ होत आहे, पण रिक्षाचे भाडे मात्र अद्याप वाढलेले नाही. २०१६ मध्ये ४२ रुपये किलो सीएनजी होता. हा दर वाढून आता ८६ रुपये झाला आहे. कर्जाने घेतलेल्या रिक्षांचा हप्ता, वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई, त्यानंतर रिक्षाची पासिंग आदी खर्च काढताना कर्जाचे ओझे वाढू लागले आहे.