पाडगावकर काव्य कट्ट्याचे उद्या आठवे पुष्‍प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडगावकर काव्य कट्ट्याचे उद्या आठवे पुष्‍प
पाडगावकर काव्य कट्ट्याचे उद्या आठवे पुष्‍प

पाडगावकर काव्य कट्ट्याचे उद्या आठवे पुष्‍प

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (बातमीदार) : मराठी ग्रंथालयातर्फे फेब्रुवारी २०२२ पासून महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर काव्य कट्‍ट्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आतापर्यंत सादर झालेल्या पुष्पांमध्ये कवी अरुण म्हात्रे, वैभव दळवी, संतोष पठारे, रवींद्र भगवते, विजयराज बोधनकर, रुपाली खैरनार, मानसी जोशी, महेश केळुसकर असे अनेक नामवंत कवी सहभागी झाले होते. आता या कार्यक्रमाचे आठवे पुष्प सादर होणार आहे. हे पुष्प शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) संध्याकाळी ६ वाजता शारदा मंदिर, मराठी ग्रंथालय, गोखले रोड, नौपाडा ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या काव्य कट्‍ट्यामध्ये अजित महाडकर हे ओव्या, हायकू, तांका, बालकविता, गीत, भायकविता, वृत्तबद्ध, आरती आणि मुक्तछंद याचे सादरीकरण करतील. आश्लेषा राजे या अभंग, आस्थाक्षरी आणि मुक्तछंदाचे तर स्वाती देंदे या गझल, शेलकाव्य, माधुसिंधू सुनिता असे अनेक प्रकारचे सादरीकरण करणार असल्‍याची माहिती मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह दुर्गेश आकेरकर यांनी दिली.