सुशोभिकरण केले; मात्र दुर्घटनेला निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुशोभिकरण केले; मात्र दुर्घटनेला निमंत्रण
सुशोभिकरण केले; मात्र दुर्घटनेला निमंत्रण

सुशोभिकरण केले; मात्र दुर्घटनेला निमंत्रण

sakal_logo
By

वसई, ता. १२ (बातमीदार) : वसई शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी पालिकेतर्फे विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे; मात्र याच्या देखभालीकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. काही चौकांत खांब वाकले असून दुर्घटनेला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वसई-विरार महापालिकेने चौकाच्या ठिकाणी मध्यभागी चबुतरे उभारले आहेत. या ठिकाणी रोषणाई, फुलांची झाडे, याचबरोबर आकर्षक साज देण्यात आला आहे; परंतु काही काळानंतर खांब वाकणे, झाडांच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकणे, वाढलेले गवत, घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे सुंदर शहराचे विद्रूपीकरण होत आहे. या ठिकाणी लावण्यात येणारे विविध फलक विद्रूपीकरणात भर घालत आहेत; परंतु महापालिका प्रशासनाने यावर कोणतीच कारवाई केली नाही. एव्हरशाईन, वसई पूर्व, वसंतनगरी, नालासोपारा, पश्चिम विरार भागात उभारण्यात आलेले अनेक चौक व त्यांच्या सुशोभीकरणाची दयनीय अवस्था झाली आहे. एव्हरशाईन येथील चौकात असणारा एक खांब पूर्णपणे वाकला आहे. या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अचानकपणे एखाद्या वाहनावर अथवा रस्त्यावर खांब कोसळला तर मोठी दुर्घटना घडू शकते.