शिल्पा मोरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिल्पा मोरे यांचे निधन
शिल्पा मोरे यांचे निधन

शिल्पा मोरे यांचे निधन

sakal_logo
By

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : ठाणे जिल्हा मजूर कामगार फेडरेशनचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुहास मोरे यांच्या पत्नी शिल्पा मोरे यांचे मंगळवारी (ता. ११) हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पळू येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार आदी नेत्यांसह ठाणे व पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.