पराग विद्यालयाने पुन्‍हा पटकावला ‘सर्वोत्कृष्ट’ बहुमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पराग विद्यालयाने पुन्‍हा पटकावला ‘सर्वोत्कृष्ट’ बहुमान
पराग विद्यालयाने पुन्‍हा पटकावला ‘सर्वोत्कृष्ट’ बहुमान

पराग विद्यालयाने पुन्‍हा पटकावला ‘सर्वोत्कृष्ट’ बहुमान

sakal_logo
By

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः मुंबईतील शाळा तंबाखूमुक्‍त ठेवण्यासाठी २०१७ पासून ‘तंबाखूमुक्त शाळा’ मोहिमेची सुरुवात शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभागाचे डॉ. मुस्ताक शेख व सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू केली आहे. या मोहिमेत २०१७-१८ व २०२२-२३ मध्ये पराग विद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शाळेचा’ बहुमान मिळाला आहे. शिक्षण निरीक्षक ऊर्मिला पारधी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक भारंबे यांना सन्मानित करण्यात आले.
शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी व विक्री, जाहिरात यावर बंदी आहे. तसे आढळल्यास तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण व तंबाखू नियंत्रण कायदा अन्वये कारवाई करण्यात येते. हीच बाब ओळखून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त वातावरण मिळवून देण्यासाठी व मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. शाळेतील विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी वर्ग यांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यास तसेच शाळेची इमारत आणि शाळेचा आवार या पदार्थांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेपासून मुक्त होण्यास मदत होणार आहे. अशा तऱ्हेने एकप्रकारे तंबाखूमुक्त शाळा मोहीम केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहिमेला पूरक कार्य करण्यासाठी उत्तेजन देणारी ठरणार आहे. याची जाणीव सर्व विद्यार्थी, पालक, कर्मचारी वर्ग व संबंधित अन्य घटकांना होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या अनुषंगाने पराग विद्यालय भांडुप पश्चिम येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

असे राबवले उपक्रम
तंबाखूमुक्त शाळा-स्वच्छ शाळा या अभियानांतर्गत सर्वप्रथम सर्व घटकांसाठी रीतसर सूचना काढून शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेमधील वर्गप्रमुखांची ‘बाल पंचायत सभा’ स्थापन करण्यात आली. या सभेचे अध्यक्षपद तत्कालीन शाळेचे मुख्याध्यापक भंगाळे यांना देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विषयाचे गांभीर्य समजण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान करण्यास पूर्णता बंदी घातली आहे. त्याचबरोबर शालेय परिसरात ठिकठिकाणी जनजागृती स्वरूपाचे फलक लावण्यात आलेले आहेत आणि वर्षभर नियोजित शिक्षकांच्या समितीच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून, विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये जनजागृती होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.