पालकमंत्री देणार मुलुंडला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री देणार मुलुंडला भेट
पालकमंत्री देणार मुलुंडला भेट

पालकमंत्री देणार मुलुंडला भेट

sakal_logo
By

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता टी वॉर्ड पालिका कार्यालयाला भेट देणार आहेत. मुलुंडमधील नागरिकांनी त्यांच्या विभागातील समस्या आणि तक्रारी लेखी स्वरूपात सादर कराव्यात, अशी विंनती माजी नगरसेविका रजनी केणी यांनी नागरिकांना केली आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय यंत्रणेसंबंधित थेट बाधित व्यक्ती अथवा समूहाच्या समस्या व तक्रारी ऐकण्यासाठी व त्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याचे निवारण करण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई उपनगरातील महापालिका वॉर्ड ऑफिसमध्ये पालकमंत्री उपलब्ध असणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आणि सोसाटीतील सदस्यांनी उपस्थित राहून समस्या अथवा तक्रारी कागदोपत्रांसोबत पालकमंत्र्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे.