अंजनाबाई बस थांबा आजही प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंजनाबाई बस थांबा आजही प्रतीक्षेत
अंजनाबाई बस थांबा आजही प्रतीक्षेत

अंजनाबाई बस थांबा आजही प्रतीक्षेत

sakal_logo
By

कुर्ला, ता. १२ (बातमीदार) ः कुर्ला पश्चिम येथील आशा पेट्रोल पंपासमोरील अंजनाबाई मगर बस थांबा आठवड्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी पूर्णतः काढण्यात आला होता. नवीन बस थांबा लवकरात लवकर बनवणार, असे आश्‍वासन पालिकेकडून नागरिकांना देण्यात आले होते. मात्र अद्यापही हा बस थांबा बनवला गेलेला नाही. त्‍यामुळे नागरिकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. येथे बस थांबा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा थांबा उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.