पाणपोईशेजारी गटाराचे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणपोईशेजारी गटाराचे पाणी
पाणपोईशेजारी गटाराचे पाणी

पाणपोईशेजारी गटाराचे पाणी

sakal_logo
By

पोलादपूर, ता. १३ (बातमीदार) : पोलादपूर बस स्थानकामध्ये असलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. तसेच पाणपोईशेजारी गटाराचे पाणी तुंबत आहे. परिसरातील अस्वच्छता निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये रोगराईची भीती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पोलादपूरची ओळख आहे. येथून बस स्थानकामध्ये मुंबई, पुणे, महाबळेश्वर, रत्नागिरी कोकणातील व इतर ठिकाणांहून वाहनांची वर्दळ असते. बस स्थानकातून पोलादपूर ग्रामीण भागामध्येही बस फेऱ्या मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे बस स्थानकामध्ये बाहेरच्या प्रवाशांसह स्थानिक प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी प्रवाशांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सध्या या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपासून पाणपोईच्या शेजारी गटाराचे पाणी तुंबलेले असते. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात आहे. पाणपोईला शेवाळे तयार झाले असून, अस्वच्छतेमुळे किड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बस स्थानकात नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी पाणपोईची स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवाशांनी या वेळी केली आहे.