अंतरयु फाउंडेशनतर्फे कपडे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंतरयु फाउंडेशनतर्फे कपडे वाटप
अंतरयु फाउंडेशनतर्फे कपडे वाटप

अंतरयु फाउंडेशनतर्फे कपडे वाटप

sakal_logo
By

बोर्डी, ता. १२ (बातमीदार) : आचार्य भिसे शिक्षण संस्था संचलित वन रावण काकूबाई लखानी माध्यमिक विद्यालयातील दहावीत शिकणाऱ्या मुलांना अंतरयु फाऊंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले. बुधवारी (ता. १२) सकाळी कपडे वाटप कार्यक्रम संस्थेच्या इंदुमती जनार्दन राऊत सभागृहात पार पडला. यावेळी मुख्याध्यापक सुभाष जाधव, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अच्युत पाटील, शिक्षिका पौर्णिमा राऊत, तसेच दहावीच्या वर्गातील शंभर विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य देण्याच्या दृष्टीने फाऊंडेशन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही निरांत राऊत यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी केले. पूर्णिमा राऊत यांनी आभार मानले.