विरार येथे शनिवारी ग्राहक पेठेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार येथे शनिवारी ग्राहक पेठेचे आयोजन
विरार येथे शनिवारी ग्राहक पेठेचे आयोजन

विरार येथे शनिवारी ग्राहक पेठेचे आयोजन

sakal_logo
By

वसई, ता. १२ (बातमीदार) : विरार पूर्वेकडील वीर सावरकर मार्ग या ठिकाणी १५ ते २१ ऑक्टोबर या काळात ग्राहकपेठेचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन विकास आघाडी व अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने हे आयोजन केले आहे. दिवाळीनिमित्त एकाच ठिकाणी विविध वस्तू, साहित्याची उपलब्धता असणार आहे. ग्राहकपेठेचे उद्‌घाटन माजी महापौर प्रवीणा ठाकूर व अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वृषाली जोशी व वंदना जोशी यांनी केले आहे.