मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बेकायदा फलकबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बेकायदा फलकबाजी
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बेकायदा फलकबाजी

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बेकायदा फलकबाजी

sakal_logo
By

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मंगळवारी मिरा-भाईंदरमध्ये आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बेकायदा फलकबाजी करण्यात आली होती. महापालिकेने परवानगी दिलेल्या होर्डिंग व्यक्तिरिक्त अन्य कुठेही फलक लावण्यास मनाई असतानाही हौशी कार्यकर्त्यांनी बेधडकपणे विजेचे खांब व झाडांवर फलक लावलेले दिसून येत होते.
शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे फलक लावण्यास मनाई करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी महापालिकेने घेतला आहे. बेकायदा फलकमुक्ती योजना राबवणारी मिरा-भाईंदर महापालिका राज्यात पहिली महापालिका ठरली होती. महापालिकेने सार्वजनिक चौकात व महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग उभारली आहेत. केवळ याच होर्डिंगवर फलक लावण्यास परवानगी आहे. हे होर्डिंग वगळता इतर ठिकाणी फलक लावण्याऱ्‍यांवर महापालिकेकडून गुन्हे दाखल केले जातात. पण मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त महापालिकेचा बेकायदा फलकबंदीचा निर्णय हैशी राजकीय कार्यकर्त्यांनी अक्षरश: धाब्यावर बसवला.