वडघर सरपंचपदी भाग्यश्री पाटील बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडघर सरपंचपदी भाग्यश्री पाटील बिनविरोध
वडघर सरपंचपदी भाग्यश्री पाटील बिनविरोध

वडघर सरपंचपदी भाग्यश्री पाटील बिनविरोध

sakal_logo
By

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री जयेंद्र पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आनंद साजरा केला.
वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा जालिंद्रनाथ पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी बुधवारी ग्रामपंचायत वडघर कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी भाग्यश्री पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे यांनी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत वडघरचे ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.