उल्हासनगरातील मुख्य बाजारपेठ स्फोटकांच्या उंबरठ्यावर, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील मुख्य बाजारपेठ स्फोटकांच्या उंबरठ्यावर,
उल्हासनगरातील मुख्य बाजारपेठ स्फोटकांच्या उंबरठ्यावर,

उल्हासनगरातील मुख्य बाजारपेठ स्फोटकांच्या उंबरठ्यावर,

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : वर्दळीच्या नेहरू चौक परिसरात असणाऱ्या मुख्य बाजारपेठेत होलसेल फटाके विक्रेत्या दुकानांची भाऊगर्दी वाढल्याने हा परिसर स्फोटकांच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नव्यानेच उल्हासनगर ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा पदभार हाती घेणारे दिलीप फुलपगारे यांनी मागील महिन्यात एका फटाके विक्रीच्या होलसेल दुकानात छापा टाकून तब्बल ४३ लाखांचा फटाक्यांचा बेकायदा साठा सील केला होता. त्यामुळे फटाक्यांच्या साठ्याचे प्रकरण ऐरणीवर आले. नेहरू चौकातील मुख्य बाजारपेठेत हे दुकान असून अशा अनेक दुकानांची भाऊगर्दी असल्याने एखादी ठिणगी पडली तर अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या वर्षी उल्हासनगर पालिकेचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी फटाक्यांच्या दुकानांवर अनपेक्षितपणे धडक दिली होती, तेव्हा परवान्याचे नूतनीकरण नाही, आग नियंत्रण प्रतिबंधक यंत्रणा नाही हे उघडकीस आल्यावर नाईकवाडे यांनी अनेक दुकानांना नोटिसा बजावून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता; मात्र या वर्षी ही दुकानाची गर्दी पाहून हा परिसर स्फोटकांच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

कोट
----------
आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा या फटाक्यांच्या दुकानांना भेटी देण्यात येणार आहेत. यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही, नूतनीकरण केले आहे की नाही, सुरक्षिततेच्या आणखीन कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याची पाहणी करण्यात येणार आहे.
- अशोक नाईकवाडे, उपआयुक्त, उल्हासनगर पालिका