पालिकेचा स्ट्रीट विद्युत पोल पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचा स्ट्रीट विद्युत पोल पेटला
पालिकेचा स्ट्रीट विद्युत पोल पेटला

पालिकेचा स्ट्रीट विद्युत पोल पेटला

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (वार्ताहर) : ठाण्याच्या माजिवडा गावात रस्त्यावर असलेला ठाणे महानगरपालिकेचा विद्युत स्ट्रीट पोल शॉर्टसर्किटमुळे अचानक पेटल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्‍निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने सिद्धार्थ नगर, माजिवडा गाव, ठाणे (प.) येथे पिठाच्या चक्कीच्या दुकानाजवळ ठाणे महापालिकेच्या स्ट्रीट पोलला आग लागली. घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी प्रथम स्ट्रीट पोलचा विद्युत प्रवाह खंडित करून आगीवर नियंत्रण मिळवले.