भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान
भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान

भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान

sakal_logo
By

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान म्हणून ११ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या सानुग्रह अनुदानात ९०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील वर्षी लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेअंती १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले होते. यंदा पालिका कर्मचारी संघटनांकडून १५ हजार रुपयांची मागणी केली जात होती. त्यानंतर आयुक्तांनी कर्मचारी संघटना प्रतिनिधी व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेत याबाबत निर्णय घेण्यात आला. या वर्षी दिवाळीपूर्वीच वेळेत सानुग्रह अनुदान प्रशासनाने जाहीर केल्याने कामगार, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.