ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू ः आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू ः आयुक्त
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू ः आयुक्त

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू ः आयुक्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके यांच्या दुबार राजीनाम्याची आज दिवसभर चर्चा रंगली. राजीनाम्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके यांनी दुसऱ्यांदा राजीनामा दिल्यानंतर पालिकेकडून या राजीनाम्यावर निर्णय अद्यापही बाकी आहे; परंतु या राजीनाम्याच्या निमित्ताने दिवसभर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला होता. 
ऋतुजा लटके यांनी २ सप्टेंबरला पालिकेच्या उपायुक्त (झोन ३) यांना राजीनामा सादर केला होता; परंतु या राजीनाम्यामध्ये अटींसह राजीनाम्याची सूचना एक महिन्याच्या मुदतीसाठी देण्यात आली होती. ‘जर लोकआग्रहाखातर मला विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली तर मला माझ्या कार्यकारी सहायक (क्लर्क) पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मला निवडणूक जाहीर होईपर्यंत माझ्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी,’ असे लटके यांनी पहिल्या राजीनाम्यात लिहिले होते. या भाषेवरच पालिकेने आक्षेप घेत हा राजीनामा नियमानुसार नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून २८ सप्टेंबरला करण्यात आला. त्यानंतर दुसरा राजीनामा हा लटके यांच्याकडून ३ ऑक्टोबर रोजी पालिकेला देण्यात आला. माझी एक महिन्याची सूचना पत्राची अट शिथिल करण्यात यावी. तसेच राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 
...
प्रशासनावर दबाव नाही!
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देतानाच नियमानुसार राजीनाम्याच्या मुद्द्यावर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रशासनावर कोणाचाही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा अर्ज आल्यानेच यासाठी पालिकेकडून तीस दिवसांच्या आतच निर्णय घेणे अपेक्षित आहे. हा राजीनामा विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी लटके यांनी अर्ज केला आहे. त्यामुळेच पालिका आयुक्तांच्या अधिकारात हा राजीनामा मंजुरीची बाब आहे. त्यांनी काम केलेल्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येईल. विशेष बाब म्हणून दिलेल्या राजीनाम्यात एक महिन्याची पगाराची रक्कम पालिकेला त्यांनी अदा केली आहे. 
...
आर्थिक तोटा
ऋतुजा लटके यांनी विशेष बाब म्हणून राजीनामा मंजूर करण्यासाठीचा अर्ज केला आहे. त्यामुळेच पालिकेकडून मिळणारे एम्प्लॉयर कॉन्ट्रुब्युशनही बुडणार आहे. तसेच २० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण न झाल्याने लटके यांना पालिकेकडून कोणतीही पेन्शन लागू होणार नाही. लटके यांच्या पगारातून वजा झालेले पैसे मात्र त्यांना परताव्याच्या रूपात मिळणार आहेत.