विक्रमगडमध्ये उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात
विक्रमगडमध्ये उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात

विक्रमगडमध्ये उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : ग्रामीण भागात निवडणूक प्रचार म्हटला की तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फोटो, जाहीरनामा घेऊन घोषणा देतात; पण सध्याच्या आधुनिक काळात हे सर्व बदलले असून प्रचारही हायटेक झाला आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर जोर दिला जात आहे. विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. यासाठी आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर भर दिला जात आहे.
‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला आहे. पण सर्व उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर आहे. प्रचारासाठी कमी दिवसांचा अवधी असल्यामुळे उमेदवार होर्डिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वच पक्ष हायटेक ऑनलाईन प्रचाराला पसंती देताना दिसत आहेत. फेसबुक, व्हॉटस्अप यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निवडणुकीतून दिसून येत आहे. कमी वेळेत अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रचार लाभदायक असल्याने विविध गाव पॅनेल त्याचा पुरेपूर वापर करत आहेत. उमेदवार आपापल्या भागात केलेल्या प्रचाराची माहिती सोशल मीडिया माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. अपलोड झालेल्या बातम्या लाईक करण्याबरोबरच शेअर करण्यासाठीही समर्थकांचे प्रयत्न सुरू आहेत.

....
विक्रमगड तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात मतदार सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे केलेला प्रचार मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
- निकेत पडवळे, समन्वयक, जिजाऊ ग्रामविकास पॅनेल, ओंदे ग्रुप ग्रामपंचायत

....
गाव-पाड्याचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया ठरत आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे केलेला प्रचार महत्त्वाचा ठरणार आहे.
- सदानंद शंकर कनोजा, सरपंच पदाचे उमेदवार, जिजाऊ ग्रामविकास पॅनेल