शहापूर शिवसेना तालुका प्रमुखपदी बाळा धानके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर शिवसेना तालुका प्रमुखपदी बाळा धानके
शहापूर शिवसेना तालुका प्रमुखपदी बाळा धानके

शहापूर शिवसेना तालुका प्रमुखपदी बाळा धानके

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) शहापूर तालुका प्रमुखपदी अखेर कुलदीप (बाळा) धानके यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दोन गटांत सुरू असलेल्या वादामुळे शहापूर तालुक्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती धिर्डे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील तालुकाप्रमुख हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते. शिवसेनेच्या नेत्यांनी शहापूर सहसंपर्क जिल्हा प्रमुख सोन्या पाटील, तालुका संपर्क संघटक जयवंत तारमळे, सहसंपर्क संघटक दत्ता ठाकरे, जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे, उपजिल्हा समन्वयक संतोष शिंदे व तालुका सचिव रवींद्र लकडे यांची नियुक्ती करून सर्व इच्छुक शिवसैनिकांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.