‘धामणकर नाका मित्र मंडळ’ जिल्ह्यात अव्‍वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘धामणकर नाका मित्र मंडळ’ जिल्ह्यात अव्‍वल
‘धामणकर नाका मित्र मंडळ’ जिल्ह्यात अव्‍वल

‘धामणकर नाका मित्र मंडळ’ जिल्ह्यात अव्‍वल

sakal_logo
By

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार या सरकारच्या स्पर्धेंतर्गत ठाणे जिल्ह्यातून भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची निवड झाली आहे. गेल्या ३४ वर्षांपासून भाजप भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती भिवंडी शहरात साकारल्याबद्दल या मंडळास महाराष्ट्र सरकारतर्फे पुरस्कृत करण्यात आले आहे. भिवंडीचे नाव राज्य स्तरावर पोहोचवण्यास सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी व सर्व मंडळाचे सदस्य यांनी भिवंडी शहर महापालिकांचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस परिमंडळ दोनचे सर्व पोलिस अधिकारी, ट्राफिक पोलिसांचे आभार मानले आहेत.