सरसकट आर्थिक दुर्बल घटकांना धान्य द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरसकट आर्थिक दुर्बल घटकांना धान्य द्या
सरसकट आर्थिक दुर्बल घटकांना धान्य द्या

सरसकट आर्थिक दुर्बल घटकांना धान्य द्या

sakal_logo
By

सरळगाव, ता. १३ (बातमीदार) : दिवाळीसाठी ज्या अर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांकडे शिधापत्रिका नाहीत अशा नागरिकांनाही धान्य देण्यात यावे, अशी मागणी आरपीआय सेक्युलर मुरबाडच्या वतीने पत्रकाद्वारे केली आहे. दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनातर्फे शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना धान्य देण्यात येणार आहे. मात्र शिधापत्रिका नसलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना धान्य मिळत नाही. यासाठी तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, उपाध्यक्ष सचिन धनगर, सहचिटणीस किशोर गायकवाड यांच्या उपस्थितीत मुरबाड तहसीलदार संदीप आवारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.