हुंड्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुंड्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
हुंड्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

हुंड्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिची बदनामी आणि माहेरहून हुंडा आणण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी महिलेचा पती, त्याच्या नातेवाईकांवर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायरा सय्यद ही विवाहिता पती व सासू, सासरे, नणंद, दीर यांच्यासोबत दिवाण शहा दर्गारोड येथील एका इमारतीमध्ये मे २०२२ ते १८ सप्टेंबर २०२२ यादरम्यान राहत होती. पती नौशाद सय्यद, सासरे मेहबूब अली सय्यद, सासू परवीन कौसर, दीर नुमान अली, अदनान, नणंद हीना, तुबा यांनी किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ करून मानसिक छळ केला होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बदनामी केली. तिच्याकडे माहेरहून हुंड्यात दुचाकी घेऊन येण्याची मागणी करीत पतीने मारहाण केली. त्यामुळे तिच्या पोटाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाल्याने गर्भपात झाला. याप्रकरणी सायरा नौशाद सय्यद हिने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती व इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.