महाराष्ट्रात झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणूक लढवल्यास काय करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात झारखंड मुक्ती मोर्चाने 
निवडणूक लढवल्यास काय करणार?
महाराष्ट्रात झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणूक लढवल्यास काय करणार?

महाराष्ट्रात झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणूक लढवल्यास काय करणार?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १३ : धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्याने तुम्हाला दुःख आहे, तसे ‘मशाल’ गेल्याने आमचीदेखील तीच परिस्थिती आहे. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला देखील ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाले आहे. उद्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवायला आला तर शिवसेना काय करेल, असा टोला समता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

निवडणूक आयोगाने ‘मशाल’ हे चिन्ह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला दिल्यानंतर समता पार्टीने या चिन्हावर दावा ठोकत त्यांना कोंडीत पकडले आहे. समता पक्ष प्रदेशाध्यक्ष देवळेकर यांनी गुरुवारी कल्याण पोलिस आयुक्तांची भेट घेत सुरक्षेची मागणी केली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समता पक्षाने निवडणूक न लढवल्याने त्यांचे चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने महाराष्ट्रात येऊन निवडणुका लढविल्या तर शिवसेनेला हे चालणार आहे का?, त्यांनी हे जाहीर करावे. कारण शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चाला दिलेले आहे. उद्या जर का झारखंड मुक्ती मोर्चाने महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढविली तर शिवसैनिक काय करतील, असा सवाल देवळेकर यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह
निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिले आहे. समता पक्षाने २०१४ मध्ये देशभरात निवडणूक लढवली होती. २००४ मध्ये आमच्या पक्षाचे चिन्ह गोठविले गेले आहे. २०१४ आणि २०२१ मध्ये बिहार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविली होती?, हे आयोगाने जाहीर करावे, कारण ही त्यांची चूक आहे, असे देवळेकर म्हणाले.