मोबाईलवर खेळण्यावरून आई ओरडल्याने मुलीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईलवर खेळण्यावरून आई ओरडल्याने मुलीची आत्महत्या
मोबाईलवर खेळण्यावरून आई ओरडल्याने मुलीची आत्महत्या

मोबाईलवर खेळण्यावरून आई ओरडल्याने मुलीची आत्महत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : वाशी गावात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन ती त्यावर खेळत असल्यामुळे आई तिला रागावली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या घटनेतील मृत मुलगी मधुकर पाटील यांच्या इमारतीमध्ये वडील फिरोज जियादअली मंडल व आई मोहमा बिबी व लहान भाऊ यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होती. दोन दिवसांपूर्वी मुलीने कुटुंबाच्या ओळखीतील व्यक्तीचा मोबाईल घेऊन तो हाताळण्यास सुरुवात केली होती. हे तिच्या आईला पटले नव्हते. त्यामुळे ती मुलीला रागावली होती. त्या दिवसापासून संतापल्याचा मुलीला राग आला होता. त्यामुळे बुधवारी (ता. १२) सायंकाळी तिची आई व भाऊ बाजारात गेले होते. या वेळी घरात एकटीच असलेल्या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद आहे.