मृताच्या कुटुंबाला ३० लाखाची नुकसान भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृताच्या कुटुंबाला ३० लाखाची नुकसान भरपाई
मृताच्या कुटुंबाला ३० लाखाची नुकसान भरपाई

मृताच्या कुटुंबाला ३० लाखाची नुकसान भरपाई

sakal_logo
By

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : घोडबंदर रोड फाऊंटन हॉटेलजवळ मागून आलेल्या एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत स्कूटरवरील जयेश कोळी (३०) याचा मृत्यू झाल्याची घटना १५ जून २०२२ रोजी घडली होती. मोटार अपघात प्राधिकरणाकडे कोळी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या नुकसानभरपाईच्या खटल्यात प्राधिकरणाचे सदस्य एच. एम. भोसले यांनी साक्षीपुरावे आणि दस्तावेज तपासून मृताच्या कुटुंबीयांना ३० लाख ७ हजारांची नुकसानभरपाई देण्याचा निकाल दिला. मृत जयेश कोळी हा पत्नी दयाबेन कोळी व कुटुंबासह पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात राहत होता. मृताच्या कुटुंबीयांना सदरची रक्कम ही दावा दाखल केल्यापासून निकालापर्यंत ८ टक्के व्याजदराने देण्याचा निकाल प्राधिकरण सदस्य भोसले यांनी दिला.