विज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचे सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचे सांत्वन
विज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचे सांत्वन

विज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचे सांत्वन

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील पिंपळशेत येथे आईसोबत शेतावर गेलेल्या चिमुकल्याचा शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल चंदू चव्हाण असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. आई-वडील आणि लहान बहीण असा छोटा परिवार असला तरी आज त्यांना मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागत आहे. वडील रोजंदारीवर सांगली येथे काम करतात, तर आई मोलमजुरी करून मुलांचे पोट भरत आहे. यबाबतची माहिती मिळतच शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची दखल घेत मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. त्यानुसार गिरीश शिलोत्री, विठ्ठल जोशी, सचिन शिरसाठ आणि हेमंत धानमेहेर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तत्काळ या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना आर्थिक मदतीचा आधार दिला.