कोपरी `आयटीआय''च्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरी `आयटीआय''च्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर
कोपरी `आयटीआय''च्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर

कोपरी `आयटीआय''च्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : कोपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (मुलींचे आयटीआय) इमारतीच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर असून ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती राज्य सरकारचे रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आमदार निरंजन डावखरे यांना पत्राद्वारे कळविली आहे.
मुलींच्या आयटीआय इमारतीची झालेली दुरवस्था, अनेक गैरसोयी असल्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्ष वेधले होते. तसेच लवकरात लवकर नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. आयटीआय इमारतीच्या कामासाठी २ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपये खर्चाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीनेही निधीसाठी तरतूद केली आहे. त्यानंतर या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.