कवाड ग्रामपंचायतीत काटे की टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवाड ग्रामपंचायतीत काटे की टक्कर
कवाड ग्रामपंचायतीत काटे की टक्कर

कवाड ग्रामपंचायतीत काटे की टक्कर

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. बहुतांश ग्रामपंचायती निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे आणि शिंदे गट तसेच राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसेचे पॅनल असे सर्व पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. अशातच भिवंडी तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या कवाड ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गटात चुरशीची लढाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दोघांमध्ये काटे की टक्कर यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहवयास मिळत आहे.
भिवंडी-वाडा मार्गावर कवाड (खुर्द) ग्रामपंचायत असून तीन हजार पाचशे साठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कवाड ग्रामपंचायत हद्दीत पाच वार्ड असून एकूण सात गावपाडे आहेत. यापैकी तीन आदिवासी पाडे आहेत. भाजपने सखाराम महाराज ग्राम विकास पॅनल हे नाव देऊन पाचही प्रभागात उमेदवार उभे केले आहे. तर सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या भाजपच्या पॅनलने मयुरी गुरव यांना सरपंच पदासाठी निवडणूक मैदानात उतरवले आहे. उद्धव ठाकरे गटाने आई गावदेवी परिवर्तन ग्राम विकास पॅनल नावाने पाच वॉर्डात उमेदवार उभे केले असून सरपंच पदासाठी उद्धव ठाकरे गटाकडून संजना सचिन शेलार ह्या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.

...........
पाड्यातील समस्या जैसे थे
ग्रामपंचायतीला घरपट्टीतून सर्वाधिक महसूल मिळत असून ग्रामपंचायत हद्दीत लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत. शिवाय शासनाच्या विविध योजनांमधूनही गाव पाड्याचा विकास होतो; मात्र आजही काही पाड्यात नागरी समस्या जैसे थे असल्याचे दिसून येते. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येणार आहे.