शाळेतील मित्र पन्नाशीत ‍भेटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेतील मित्र पन्नाशीत ‍भेटले
शाळेतील मित्र पन्नाशीत ‍भेटले

शाळेतील मित्र पन्नाशीत ‍भेटले

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः शाळेतल्‍या आठवणीत रमण्याची संधी गिरणगावातील के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्‍या माजी विद्यार्थ्यांना तब्‍बल ५० वर्षांनंतर मिळाली. या शाळेच्या १९८६ च्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात पार पडले.
संगणकाच्या महाजालात समजमाध्यमांचा सुयोग्य वापर करून या बॅचचे विद्यार्थी एकत्र जोडले गेले. सर्व वर्गमित्रांचा ५० वा वाढदिवस सामूहिक रीतीने साजरा करण्याच्या निमित्ताने शाळेतील मित्र-मैत्रिणींनी मिळून ‘आमची पन्नाशी’ हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले. हा सर्व वर्गमित्रांचा पन्नासावा वाढदिवस राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्‍या मामासाहेब फाळके सभागृहात साजरा करण्यात आला.
या वेळी सर्व मित्रांना शाळेची आठवण म्हणून शाळेचा बॕच देण्यात आला. काही वर्गमित्रांचे अकाली निधन झाले होते, त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेत केले जात असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम देवेंद्र शेलार, सुरेंद्र जाधव, डॉ. सतीश पळशीकर, भारती उपडे, चंदा चव्हाण, आरती बागवे, सविता गावकर यांनी सादर केले. अनिल तेल्ला आणि शोभा मळेवाडकर यांनी गाणी गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.