जप्त केलेल्या प्रतिज्ञापत्रांची गुन्हे शाखेकडून पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जप्त केलेल्या प्रतिज्ञापत्रांची गुन्हे शाखेकडून पडताळणी
जप्त केलेल्या प्रतिज्ञापत्रांची गुन्हे शाखेकडून पडताळणी

जप्त केलेल्या प्रतिज्ञापत्रांची गुन्हे शाखेकडून पडताळणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या समर्थनार्थ ठाकरे समर्थकांकडून तयार करण्यात आलेली ४,५०० हून अधिक प्रतिज्ञापत्रे मुंबई पोलिसांनी ८ ऑक्टोबर शनिवारी रात्री कारवाई करत जप्त केली. या प्रकरणात निर्मलनगर पोलिस ठाण्याने अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला होता आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने बुधवारी आपल्या टीम वसई, विरार, पालघर, कोल्हापूर, सोलापूर आणि इतर ठिकाणी पाठवल्या आहेत.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेली सर्व ४,६८२ प्रतिज्ञापत्रे तपासली असून त्यानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ज्या व्यक्तींच्या नावाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ही प्रतिज्ञापत्रे दिली आहेत का याचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
...
ज्यांच्या नावाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने ही प्रतिज्ञापत्रे दिली आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात आम्ही अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. चौकशीनंतर कारवाई करू.
- संग्रामसिंग निशाणदार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, मुंबई पोलिस