२९० सफाई कामगारांसाठी संघटना रेल्वे मंत्र्यांच्या दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२९० सफाई कामगारांसाठी संघटना रेल्वे मंत्र्यांच्या दारी
२९० सफाई कामगारांसाठी संघटना रेल्वे मंत्र्यांच्या दारी

२९० सफाई कामगारांसाठी संघटना रेल्वे मंत्र्यांच्या दारी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सीएसएमटी स्थानकात स्वच्छतेचे काम करणाऱ्या २९० मराठी सफाई कामगारांना नव्या कंत्राटदाराने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्‍यांवर ऐन दिवाळीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केल्यानंतर कामगार संघटनेने गुरुवारी (ता.१३) मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन मराठी सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार असून हे प्रकरण रेल्वे मंत्र्यांकडे घेऊन जाण्याचा निर्धार केल्याचे सांगितले.
सीएसएमटी रेल्वेस्थानकात २९० कंत्राटी सफाई कामगार कार्यरत होते. यातील अनेक कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून इथे कार्यरत होते. मात्र सफाई कंत्राट संपल्याने नव्या कंत्राटदाराची नेमणूक झाली. या कंत्राटदाराने यापेक्षाही कमी पगारात माणसे मिळतात म्हणून जुने २९० सफाई कर्मचारी काढून शंभर नव्या कामगारांची भरती केली. ११ हजार रुपये प्रतिमहिना वेतनावर काम करायचे असेल तर करा, अन्यथा घरी जा, असे जुन्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. या निर्णयामुळे एका फटक्यात २९० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
२९० सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी रेल्वे मंत्र्यांकडे जाणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे अध्यक्ष अमित भटनागर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
...
मध्य रेल्वेवर स्वच्छतेचा कंत्राटदार बदलल्याने मला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
- पूजा पाटील, कंत्राटी सफाई कर्मचारी, सीएसएमटी
...
रेल्वे मंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी आम्हाला तत्काळ स्वच्छतेच्या कामावर घ्यावे, अन्यथा आम्हाला सहकुटुंब आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी.
- सचिन जगताप, कंत्राटी सफाई कर्मचारी, सीएसएमटी
...
सरकारला एकच विनंती आहे की, आम्हाला दुसरीकडे नोकरी मिळेपर्यंत एक ते दोन महिन्याचे आगाऊ वेतन द्यावे.
- रजिता राजा, कंत्राटी सफाई कर्मचारी, सीएसएमटी