पालिकेच्या डॉक्टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या डॉक्टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
पालिकेच्या डॉक्टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

पालिकेच्या डॉक्टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. सतीश गेडाम यांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. किरकोळ कारणावरून विजय गोसावी याने रुग्णालयातील रुग्णाशी हुज्जत घातली. या वेळी सतीश यांनी त्यास बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने तुम्ही मला बोलणारे कोण, असे म्हणत त्यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. डॉ. सतीश यांनी याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी विजय याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.