नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचे डिबेंचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचे डिबेंचर
नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचे डिबेंचर

नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टचे डिबेंचर

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टने प्रत्येकी एक हजार रुपये मूल्याचे अपरिवर्तनीय डिबेंचर (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर) बाजारात आणले आहे. त्यावर वार्षिक ७.९० टक्के दराने परतावा मिळेल. हा इश्यू साडेसातशे कोटी रुपयांचा असून त्याव्यतिरिक्त आणखी जादा जमा झालेले साडेसातशे कोटी रुपये स्वीकारण्याचा हक्क ट्रस्टने राखून ठेवला आहे. या इश्यूमध्ये सर्वप्रथम गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वप्रथम डिबेंचर दिले जातील. त्यामुळे पंधराशे कोटी रुपयांचा भरणा झाल्यावर लगेच या इश्यूसाठी पैसे स्वीकारणे बंद केले जाईल. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करायची आहे, त्यांनी पहिल्या दिवशीच गुंतवणूक करावी, असेही आज सांगण्यात आले.

नॅशनल हायवे अथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच लीड मॅनेजर आणि क्रेडिट रेटिंग संस्था आदींच्या अधिकाऱ्यांनी आज याबाबत पत्रकारांना माहिती दिली. या इश्यूला केअर रेटिंग व इंडिया रेटिंग रिसर्च प्रा. लिमिटेडने ट्रिपल ए असा दर्जा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुद्रित संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे म्हणून या इश्यूमधील किमान गुंतवणूक १० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे डिबेंचर अत्यंत चांगले आहेत असेही ते या वेळी म्हणाले.
--------
किमान दहा हजार गुंतवणूक
या इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना किमान १० डिबेंचरमध्ये १० हजार रुपयांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यांना प्रत्येकी ३००, ३०० व ४०० रुपयांचे तीन डिबेंचर दिले जातील. त्यांची मुदत अनुक्रमे १३ वर्षे, १८ वर्षे आणि २५ वर्षे असेल. या डिबेंचरवर वार्षिक ७.९० टक्के दराने परतावा दिला जाईल. हा परतावा दर सहा महिन्यांनी दिला जाईल. हे डिबेंचर बी. एस. ई. व एन. एस. ई.वर नोंदवले जातील.