डहाणूत सापडले बेवारस बाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत सापडले बेवारस बाळ
डहाणूत सापडले बेवारस बाळ

डहाणूत सापडले बेवारस बाळ

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू शहरातील लोणीपाडा येथे इलियास किराणा दुकानासमोर काटी रोडकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या बाजूला एका दिवसाचे स्त्रीजातीचे बाळ सापडले. अज्ञातांनी त्याला गोधडीत गुंडाळून कापडी पिशवीत घालून वाढलेल्या गवतात ठेऊन तिथून पळ काढला. याबाबत स्थानिकांनी डहाणू पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बंडगर यांनी घटनास्थळाला भेट देत, नवजात बालकाला आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याची तपासणी केली असता प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगिता सांगळे करीत आहेत.