मुलुंडमध्ये दिवाळी पहाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये दिवाळी पहाट
मुलुंडमध्ये दिवाळी पहाट

मुलुंडमध्ये दिवाळी पहाट

sakal_logo
By

मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः मुलुंड सेवा संघातर्फे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने सप्तसुरांची संगीत आणि प्रकाशमय अशा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (२२ ऑक्टोबर) धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी सात वाजता कालिदास नाट्यगृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये गायक श्रीरंग भावे, शमिका भिडे, दत्ता मेस्त्री आणि अमृता दहिवेलकर आदींचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून सर्व मुलुंडकरांनी त्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.