कांदिवलीत दुतर्फा रिक्षा पार्किंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत दुतर्फा रिक्षा पार्किंग
कांदिवलीत दुतर्फा रिक्षा पार्किंग

कांदिवलीत दुतर्फा रिक्षा पार्किंग

sakal_logo
By

कांदिवली, ता. १५ (बातमीदार) ः कांदिवली पूर्व येथील एकमेव मुख्य मार्ग असलेल्‍या आकुर्ली रोडवर दुतर्फा रिक्षाचालकांनी पार्किंग सुरू केली आहे. दोन्ही बाजूला रिक्षा पार्किंग केल्याने मुख्य मार्ग अरुंद झाल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वाहतूक विभागाला तक्रार करूनदेखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
कांदिवली पूर्व स्टेशन ते दामूनगर, क्रांती नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, म्हाडा कॉलनी आणि महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीकडे जाणारा आकुर्ली हा एकमेव मुख्य मार्ग आहे. या मार्गावर अवजड वाहने, बेस्ट आणि खासगी बसेस यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच महिंद्रा कंपनीच्या समोर याच मुख्य मार्गावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फार मोठे उद्यान आहे. त्‍यामुळे नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते; मात्र मार्गाच्या दुतर्फा रिक्षाचालक राजरोसपणे आपली रिक्षा उभी करतात. अवैध रिक्षा पार्किंगमुळे नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वेळोवेळी करवाई केली जाते. या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. कारवाई करून रिक्षा हटवल्यास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या सर्वच गाड्यांवर कारवाई करावी लागेल.
- सोमेश्वर कामठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक समतानगर वाहतूक विभाग