शिंदे गटाचा उल्हासनगरात जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाचा उल्हासनगरात जल्लोष
शिंदे गटाचा उल्हासनगरात जल्लोष

शिंदे गटाचा उल्हासनगरात जल्लोष

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : ढाल-तलवार ही मावळ्यांची निशाणी असून ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गटाला मिळाली आहे. यासाठी शिंदे गटाने उल्हासनगरात जल्लोष केला आहे. या जल्लोषाने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला होता.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेब शिवसेना असे नाव देऊन ढाल-तलवार ही निशाणी दिली आहे. ही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची निशाणी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
निशाणी मिळाल्‍याच्‍या आनंदानिमित्त उल्हासनगरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित आलेल्या शिंदे गटाने ढाल-तलवारीसह पेढे, मिठाई वाटून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केल्याने चौक दुमदुमून गेला.
या वेळी ज्‍येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, कलवंतसिंग सहोता (बिट्टु), ज्‍येष्ठ शिवसैनिक नाना बागूल, शिक्षण समितीच्या माजी सभापती शुभांगी बेहनवाल, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, शाखाप्रमुख सुनील (कलवा) सिंग, पदाधिकारी तिरुपती रेड्डी, प्रमोद पांडे, विनोद सालेकर, मनोहर बेहनवाल, गणेश साळुंके, सुजित पंजाबी, विशाल म्हस्के, आनंद आचार्य, राजा यादव, रवी चिमणानी, कुणाल गोखलानी, भावेश गोखलानी, कुलदीप यादव, दास अंकल, निरज माखिजा, सुरेश यादव, अर्जुन ढकोलिया, मोहन मूलचंदानी, पंकज जयस्वाल, करण खत्री आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढाल-तलवार ही मावळ्यांची निशाणी असून आम्ही मावळ्यांसारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सोबत राहणार अशी प्रतिक्रिया ज्‍येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी व्यक्त केली.