कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा १२ तास बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tap
कल्याण-डोंबिवलीमध्ये मंगळवारी पाणीबाणी

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा १२ तास बंद

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १५० दशलक्ष लिटर मोहिली उदंचन केंद्र व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र, तसेच बारावे व मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मंगळवारी ही दुरुस्ती करण्यात येणार असल्याने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कल्याण-डोंबिवलीमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या दुरुस्ती कामामुळे नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारावे व मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून महापालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, वडवली, शहाड व टिटवाळा परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.